इंग्रजी अभ्यास मंडळाच्या सदस्यांशी डहाणूतील शिक्षकांचा थेट संवाद
प्रथमच डहाणूत प्रयोग
शनिवार दि.16 सप्टेंबर 2017 रोजी पंचायत समिती, डहाणू आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे पुनरर्चित अभ्यासक्रम इ. 9 वी च्या इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून मी डहाणू तालुक्यातील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले . राज्य तंत्रस्नेही आनंद अनेमवाड यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने मी स्वतः परिश्रम करून अभ्यासक्रमाबाबत अनेक PDF, PPT, व्हिडीओ तयार केले आहेत . मी तयार केलेले व्हिडीओ YOUTUBE च्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचविले आहेत. मी तयार केलेले सर्व साहित्य whatsapp वरून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचा सर्व शिक्षकांना फायदा होत आहे. प्रशिक्षणादरम्यान मी इंग्रजी विषय अभ्यास मंडळाचे सदस्य श्री.अशोक गायकवाड, श्री.अनिल पेटकर, श्री.अखिल भोसले, श्री.बाळकृष्ण शिंदे आणि श्री.साहेबराव महाजन यांना whatsapp वरून व्हिडीओ कॉल करून शिक्षकांना प्रत्यक्ष त्यांना भेटण्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षकांच्या शंकांचे निरसन प्रत्यक्ष अभ्यास मंडळाच्या सदस्यांकडून करून देण्याचा व्हिडीओ कॉल प्रयोग महाराष्ट्रात प्रथम डहाणूत केल्याचा आनंद शिक्षकांनी व्यक्त केला. असेच प्रयोग सर्वत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
श्री.बी.आर.चव्हाण.

No comments:
Post a Comment